‘उज्ज्वल नांदेड’ पॅटर्न इतर जिल्ह्यांसाठी उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 00:21 IST2017-07-07T00:20:19+5:302017-07-07T00:21:14+5:30
नांदेड : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाव्यात या धडपडीने जिल्हा प्रशासनाची उज्ज्वल नांदेडच्या माध्यमातून सुरू असलेली

‘उज्ज्वल नांदेड’ पॅटर्न इतर जिल्ह्यांसाठी उपयुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळाव्यात या धडपडीने जिल्हा प्रशासनाची उज्ज्वल नांदेडच्या माध्यमातून सुरू असलेली ज्ञानदानाची सेवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासाठी आदर्श आहे, असे प्रतिपादन एमपीएससीतील टापर्सने नांदेडातील कार्यक्रमात केले़
जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड-वाघाळा शहर मनपा व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिन्याच्या ५ तारखेला स्पर्धा परीक्षा मार्गर्शन शिबिर घेण्यात येते़ ५ जुलै रोजी आयोजित शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले एमपीएससी टॉपर्सही विद्यार्थ्यांची गर्दी पाहून भारावून गेले़
शिबीराच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त गणेश देशमुख तर निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी या पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम आलेले भूषण अहिरे, द्वितीय आलेले श्रीकांत गायकवाड, पोलीस उपअधीक्षक या पदासाठी खेळाडू प्रवर्गातून प्रथम आलेले सुदर्शन पाटील, नांदेड येथे नुकतेच रुजू झालेले परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले, निवड झालेले पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले, तहसीलदार श्रीकांत निळे पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे मंचावर उपस्थित होते़
विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहून ती पूर्ण होईपर्यंत त्यांचा पाठलाग, कष्ट करुन यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार घेवून परिश्रम घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल नांदेडला दिलेल्या सहकार्याचे कौतुक करुन जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव तयार असल्याचे सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे यांनी स्पर्धा परीक्षेस सामोरे जाताना कशा पद्धतीने सक्षमपणे सामोरे जावे तसेच याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदीची माहिती दिली़ मेहनतीसोबतच मार्गदर्शन आवश्यक असल्याचे साांगून त्यांनी नजीकच्या काळात होणाऱ्या परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी उज्ज्वल नांदेड मोहिमेचे आयोजन, साध्य झालेले यश व पुढील काळातील आयोजनाची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अव्वल कारकून मीना सोालपूर यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रेरणा गिताने केली. सूत्रसंचलन मुक्तीराम शेळके तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी हुस्से यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रताप सूर्यवंशी, शैलेश झरकर, आरती कोकुलवार, बाळू पावडे, संजय कर्वे, अजय वट्टमवार, कोंडीबा गाडेवाड, रघुवीर श्रीरामवार, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड आदींनी सहकार्य केले.