मराठी चित्रपटाला उज्ज्वल भवितव्य

By Admin | Updated: September 26, 2014 01:54 IST2014-09-26T01:17:23+5:302014-09-26T01:54:09+5:30

सितम सोनवणे, लातूर ‘इश्क वाला लव्ह’ हा चित्रपट नव्या बांधणीचा असून अशा प्रकारच्या नवनवीन चित्रपटाने मराठी चित्रसृष्टी समृद्ध बनत आहे़ त्यामुळे मराठी चित्रपटाला

Bright future for Marathi film | मराठी चित्रपटाला उज्ज्वल भवितव्य

मराठी चित्रपटाला उज्ज्वल भवितव्य


सितम सोनवणे, लातूर
‘इश्क वाला लव्ह’ हा चित्रपट नव्या बांधणीचा असून अशा प्रकारच्या नवनवीन चित्रपटाने मराठी चित्रसृष्टी समृद्ध बनत आहे़ त्यामुळे मराठी चित्रपटाला आगामी काळात उज्ज्वल भवितव्य आहे, असे मत चित्रपट अभिनेते अदिनाथ कोठारे यांनी बुधवारी व्यक्त केले़
‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते लातूरला आले असता त्यांनी ‘लोकमत’शी मुक्त संवाद साधला़ अदिनाथ कोठारे म्हणाले , मराठी चित्रपटाच्या प्रवासात वेड लावे जीवा, सतरंगी रे, हिंदीतील स्पॉट बॉय, दुभंग तसेच मराठी संगीत नाटक आॅल द बेस्ट, झपाटलेला-२ या चित्रपटात अभिनय करीत या क्षेत्रात मी समृद्ध बनण्याचा प्रयत्न करत आहे़ अवताराची गोष्ट या चित्रपटाला तर झी गौरव फिल्म अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे़ व मलाही उत्कृष्ट कलावंत म्हणून माझाही गौरव करण्यात आला आहे़
सिनेमा हे महत्वाचे माध्यम आहे़ प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारे प्रभावी साधन आहे़ चित्रपटामुळे बरेच लोक प्रेरित होतात़ त्यांच्या जीवनात कायापालट होतो़ तर काही चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून असतात़ प्रेक्षकांना निखळ मनोरंजीत करण्यासाठी बनविले जातात़ या दोन्ही प्रकारच्या चित्रपटात मी काम केले आहे. पे्रक्षकांनीही मला भरभरुन प्रेम दिले आहे़ यापुढे जावूनही मला निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रात मोठ व्हायचं आहे़ येणाऱ्या प्रत्येक संधीच सोनं करुन जीवनात यशस्वी व्हायच आहे़
वडील महेश कोठारे यांनी सांगितल्याप्रमाणे मी सतत मेहनत करत राहतो़ जे करतो ते उत्तम करतो़ आणि त्यामुळेच आज मराठी चित्रपटात माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करु शकलो़ यापुढेही चांगल्या पद्धतीचे चित्रपट करुन मराठी चित्रपटात चांगले काम करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले़

Web Title: Bright future for Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.