शाखा अभियंत्यास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 22:59 IST2017-02-21T22:56:08+5:302017-02-21T22:59:05+5:30

नळदुर्ग : स्वामी यांनी शाखा अभियंता व रणखांब यांना शिवीगाळ केली़

Brigade of the Branch Engineer | शाखा अभियंत्यास शिवीगाळ

शाखा अभियंत्यास शिवीगाळ

नळदुर्ग : वीज कंपनीचे अणदूर येथील शाखा अभियंता सतिश शिंदे व इतर चार सहकारी मंगळवारी दुपारी सराटी गावात थकीत वीजबिल वसुलीसाठी व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी गेले होते़ त्यावेळी थकीत वीजबिलामुळे नागनाथ बिराजदार, गाजीद्दीन शेख यांचा विद्युत पुरवठा खंडित केला़ त्यानंतर गावातीलच मल्लीनाथ स्वामी यांच्याकडे वीजबिलाची मागणी केल्यानंतर स्वामी यांनी बील भरणार नाही, असा पवित्रा घेतला़ त्यामुळे वसुली पथकातील विद्युत सहाय्यक के़व्ही़रणखांब हे खांबावर चढून विद्युत पुरवठा खंडित करीत होते़ त्यावेळी स्वामी यांनी वीज पुरवठा खंडित करण्यास मज्जाव करीत रणखांब यांना शिवीगाळ करून दगड फेकून मारले़ त्यामुळे रणखांब हे पोलवरून खाली उतरले असता स्वामी यांनी शाखा अभियंता व रणखांब यांना शिवीगाळ केली़ तर अमृत नामदेव सुरवसे यांनी शाखा अभियंत्यांची गच्ची धरली व नरसप्पा बिराजदार यांनी रणखांब यांना धक्काबुक्की केली़ तर अमोल मुळे यानेही धक्काबुक्की करण्यात आल्याची फिर्याद शाखा अभियंता सतीश शिंदे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली़ या फिर्यादीवरून मल्लीनाथ स्वामी, अमृत सुरवसे, नरसय्या बिराजदार, अमोल मुळे या चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला. तपास सपोनि पांचाळ हे करीत आहेत़

Web Title: Brigade of the Branch Engineer