शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर निलंबित; लाडका एजंट ‘के. एम.’ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:04 IST

मंजूर संचिकांची चौकशी सुरू, दस्तऐवज घेतले ताब्यात ; खासगी वसुली एजंटांनीच केले अनेक व्यवहार

छत्रपती संभाजीनगर : निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यांना लाचखोरीच्या प्रकरणात २७ मे रोजी अटक झाल्यानंतर या जोडगोळीच्या कार्यकाळातील शासकीय जमिनीची सर्वच प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली. त्यामुळे या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी बुधवारपासून सुरू झाली. यात ‘के. एम.’ या एजंटचे नाव वारंवार पुढे येत आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्यासह त्रिसदस्यीय समिती नियुक्त आहे. समितीला मंगळवारी स्वतंत्र आदेशाची प्रत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. खिरोळकर, त्रिभुवन यांनी संचिका कशा मंजूर केल्या, याची चौकशी करण्यासाठीचे आदेश मंगळवारी मिळाले. पूर्ण दस्तऐवज, मंजुरीच्या आदेशांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे, असे चौकशी समितीचे अध्यक्ष अडकुणे यांनी सांगितले. लोकमतच्या वृत्तातून याचा पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने समिती नेमली आहे. जिल्ह्यात वर्ग-२ मध्ये असलेल्या गायरान जमिनी वर्ग-१ मध्ये करण्याचा सपाटा लावल्याने खिरोळकर व गँग लाचेच्या जाळ्यात अडकली. ८८ च्या आसपास प्रकरणे त्यांच्या काळात मंजूर केल्याची प्राथमिक माहिती आहे. चौकशीअंती सर्व समोर येईल.

‘के. एम.’ नावाच्या एजंटची जास्त चर्चा....देवाण-घेवाण करण्यासाठी काही खासगी एजंट नेमले होते. त्यात ‘के. एम.’ नावाच्या एजंटची जास्त चर्चा आहे. तोच व्हॉट्सअप कॉल करून सर्व काही ठरवत असे. खिरोळकरांच्या दालनातून एक विशिष्ट चिठ्ठी त्याला मिळाल्यानंतर पुढील निर्णय होत असत. लाचलुचपत विभागाकडून देखील चौकशी समिती कॉल रेकॉर्डिंगची माहिती घेत आहे. कोणत्या एजंटकरवी व्यवहार झाले आहेत, त्यात प्रशासनातील किती जणांचा सहभाग होता, याची माहिती चौकशीअंती समोर येईल.

तलाठी महासंघाने केली होती तक्रारखिरोळकर आणि चमूने तर प्रशासन पूर्णत: ताब्यात घेतले होते. तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या मागील वर्षी बदल्यांमध्ये धुमाकूळ घातल्याने तलाठी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सगळ्या आर्थिक उलाढालीची माहिती दिली होती. तलाठ्यांना मर्जीतील ठिकाण देण्यासाठी एका सलून अकादमीतून प्रशासकीय निर्णय झाल्याची चर्चा त्यावेळी होती. यंदा १८९ बदल्यांपैकी काहींमध्ये व्यवहार पूर्ण झाले होते. परंतु, खिरोळकर अडकला, त्याचे पंटर पसार झाल्यामुळे अनेकांची रक्कम बुडाली आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभागAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग