मानद व्याख्यात्याने स्वीकारली दोन हजार रुपयांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:54 IST2017-08-08T00:54:04+5:302017-08-08T00:54:04+5:30
उद्योजकता विकास केंद्रात मानद व्याख्याता म्हणून कार्यरत एकास लाचलुचपत विभागाने दोन हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक केली.

मानद व्याख्यात्याने स्वीकारली दोन हजार रुपयांची लाच
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तरुण पिढीला उद्योग व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासन उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, या केंद्रालाही आता लाचखोरीची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील उद्योजकता विकास केंद्रात मानद व्याख्याता म्हणून कार्यरत एकास लाचलुचपत विभागाने दोन हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक केली.
अशोक अण्णाजी सोनवणे (४०, रा. शेलगाव, ता. बदनापूर) असे लाच स्वीकारणाºया व्याख्यात्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव येथे शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतले आहे.
प्रशिक्षण देणाºया शिक्षकाने तक्रारदारास बीज भांडवल योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रातून शेळी पालनासाठी पंधरा लाखांपर्यंतचे कर्ज मिळते, असे सांगितले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, विनोद चव्हाण, अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, नंदू शेंडीवाले, आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, संदीप लव्हारे, सोनवणे, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.