लाचखोर लिपिकास हिंगोलीत अटक
By Admin | Updated: August 26, 2014 01:31 IST2014-08-26T00:33:31+5:302014-08-26T01:31:46+5:30
हिंगोली : सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेला कामाची आॅर्डर मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करून ३ हजार रूपये घेताना लिपिकास पकडण्यात आले आहे

लाचखोर लिपिकास हिंगोलीत अटक
हिंगोली : सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेला कामाची आॅर्डर मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करून ३ हजार रूपये घेताना लिपिकास पकडण्यात आले आहे. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅन्टीनमध्ये २५ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अॅन्टी करप्शन ब्युरोने ही कारवाई केली.
याबाबत कळमनुरी येथील गरीबनवाज सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष अब्दुलखाँ मन्नानखाँ पठाण (रा. मदिना नगर) यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्यावरून नांदेडच्या अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक एन. व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापूरकर, पोलीस निरीक्षक विशाल काळे, सपोउपनि शेख शमीम, जमादार शेख उमर, पोना कांदे, राजेशकुमार साहू, चापोना नागनाथ घुगे, कांबळे यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या जिल्हा स्वयंरोजगार व रोजगार मार्गदर्शन केंद्रातील लिपिक पांडुरंग गणपत वाखरडकर (वय ५५) याने अब्दुलखाँ पठाण यांना संस्थेमार्फत सफाई कामगार, सुरक्षागार्ड पुरवण्याच्या कामाची आॅर्डर काढून देतो. त्यासाठी ३ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. (प्रतिनिधी)