शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी मागितली लाच; बिडकीनमध्ये एसीबीचा 'ट्रॅप', डॉक्टर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:16 IST

मोफत शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी; बिडकीन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, सफाई कामगार अटकेत

बिडकीन : शासकीय रुग्णालयात मोफत होणाऱ्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी १ हजार २०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बिडकीन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कंत्राटी सफाई कर्मचारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदाराच्या बहिणीची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात करायची होती. ही शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत होणे अपेक्षित असताना येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय बजरंग दळवी यांनी ५ एप्रिल रोजी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शासकीय सेवा मोफत असताना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ६ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीची पडताळणी केली असता, डॉ. दळवी यांनी शस्त्रक्रिया करून देण्यासाठी तडजोडीअंती १ हजार २०० रुपये लाच मागितल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. ही रक्कम त्यांनी रुग्णालयातील सफाई कामगार नारायण हरिश्चंद्र ब्राह्मणे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी रुग्णालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून १ हजार २०० रुपये स्वीकारताच ब्राह्मणे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मुख्य आरोपी डॉ. दळवी यांनाही पोलिसांनी झडप घालून अटक केली.

मोबाइल आणि रोख रक्कम जप्तकारवाईदरम्यान डॉ. दळवी यांच्याकडून एक मोबाइल, तर सफाई कामगार ब्राह्मणे याच्याकडून लाचेची रक्कम आणि मोबाइल जप्त करण्यात आला. सध्या आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, तपास अधिकारी संतोष तिगोटे, हवालदार इंगळे आणि युवराज हिवाळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor arrested for bribery in free surgery scheme.

Web Summary : A doctor in Bidkin was arrested for accepting a bribe of ₹1200 for a free family planning surgery. An ACB trap caught the doctor and a sanitation worker red-handed after a complaint was filed.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग