हजेरी बिलावरील स्वाक्षरीसाठी गृहपालाने स्वीकारली लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:36 IST2017-08-12T00:36:18+5:302017-08-12T00:36:18+5:30

वसतिगृहातील कर्मचाºयांच्या हजेरी बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाºया अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील गृहपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले

 The bribe accepted by the Housing Bank for signing the signature bill | हजेरी बिलावरील स्वाक्षरीसाठी गृहपालाने स्वीकारली लाच

हजेरी बिलावरील स्वाक्षरीसाठी गृहपालाने स्वीकारली लाच

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वसतिगृहातील कर्मचाºयांच्या हजेरी बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी १२ हजारांची लाच स्वीकारणाºया अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील गृहपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. ज्ञानदेव किसनराव खेडकर (४२ रा. पडेगाव, जि. औरंगाबाद) असे लाच स्वीकारणाºया गृहपालाचे नाव आहे.
अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या हाऊसकीपिंगचे काम मुंबईच्या एका खासगी संस्थेकडे आहे. या प्रकरणातील तक्रारदाराची खासगी संस्थेने व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे. हाऊसकीपिंगचे काम करणाºया कर्मचाºयांच्या हजेरी बिलावर गृहपालाने स्वाक्षरी केल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून पगार बील मंजूर केले जाते. या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी गृहपाल ज्ञानदेव खेडकर याने तक्रारदारास १३ हजारांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून शुक्रवारी वसतिगृहात सापळा रचला. गृहपाल ज्ञानदेव खेडकर यास पंचासमक्ष १२ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद, विनोद चव्हाण, अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, नंदू शेंडीवाले, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, रमश्ो चव्हाण, ज्ञानदेव म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.

Web Title:  The bribe accepted by the Housing Bank for signing the signature bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.