जुनी कामे पूर्ण केल्यासच बीआरजीएफचा निधी
By Admin | Updated: November 28, 2014 01:08 IST2014-11-28T00:23:56+5:302014-11-28T01:08:16+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेची मागील तीन वर्षांतील कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच निधीचे वितरण करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

जुनी कामे पूर्ण केल्यासच बीआरजीएफचा निधी
हिंगोली : जिल्ह्यातील मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेची मागील तीन वर्षांतील कामे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनाच निधीचे वितरण करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.
या योजनेत ११.३९ एवढा निधी जिल्ह्याला मंजूर आहे. यात ग्रामपंचायतींची ९.0१ कोटींची ८२२ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामांना प्रशासकीय मंजुरी ेदेण्याचे काम सध्या सुरू आहे. हिंगोली पंचायत समितीत १.१३ कोटींच्या ४८ ग्रामपंचायतींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ.विशाल राठोड यांनी दिली. तर जिल्ह्यातील इतर पंचायत समितींच्या कामांनाही प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. त्यात औंढ्यात २२ ग्रा. पं. च्या ६५ लाखांच्या, वसमतच्या ५१ ग्रा. पं. च्या १.४४ कोटींच्या, कळमनुरीच्या ७६ ग्रा. पं. च्या १.८३ कोटींच्या तर सेनगाव तालुक्यातील ३६ ग्रा. पं. च्या ७७ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
२00९ ते १३ या कालावधीत ग्रामपंचायतींनी विविध कामे घेतली. मात्र अनेकांनी ही कामे पूर्ण केली नाहीत. दरवर्षी नवा निधी मिळत गेला म्हणजे जुन्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे जुनी कामे केल्याशिवाय नवा निधीच वितरित केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. रस्ता, नाली, संरक्षक भिंत, तारकुंपन, जनावरांसाठी पानवठे, अंगणवाडी दुरुस्ती असे कामे घेतली जातात. जी कामे निधीअभावी रखडली वा निधीच मिळणार नाही, अशी कामे यात अपेक्षित आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)