कुºहाडीने मारहाण; सश्रम कारावास

By Admin | Updated: May 9, 2014 00:24 IST2014-05-09T00:23:48+5:302014-05-09T00:24:47+5:30

हिंगोली : शेतीच्या वादातून कुºहाडीने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकणी एका आरोपीस न्यायालयाने १ महिना सश्रम कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

Breathless; Rigorous imprisonment | कुºहाडीने मारहाण; सश्रम कारावास

कुºहाडीने मारहाण; सश्रम कारावास

 हिंगोली : शेतीच्या वादातून कुºहाडीने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकणी एका आरोपीस न्यायालयाने १ महिना सश्रम कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कळमनुरी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने ६ मे रोजी हा निकाल दिला. कळमनुरी येथील इंदिरा नगर भागात राहणारे दीपक मधुसुदन वाकडे (वय ४५) हे १३ नोव्हेंबर २०११ रोजी वाकोडी शिवारात आपल्या शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. मोटारसायकल वसंतराव नाईक यांच्या शेताजवळ उभी केली असता रमेश पंडितराव वाकडे (२२), शोभाबाई पंडितराव वाकडे (४७, दोघे रा. वाकोडी, ता. कळमनुरी) हे दोघे त्या ठिकाणी आले. ‘आमच्या शेतात चालू असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकास का बोलावून घेतोस?’ असे म्हणून रमेश वाकडे याने त्याच्या हातातील कुºहाडीने दीपक वाकडे यांच्या पायावर व हातावर मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यावेळी गावातील काही लोकांनी भांडण सोडवून दीपक वाकडे यांना कळमनुरी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा जवाब नोंदवला. दीपक वाकडे यांच्या जवाबावरून आरोपी रमेश पंडितराव वाकडे, शोभाबाई पंडितराव वाकडे या दोघांविरुद्ध कलम ३२६, ३४ भादंविनुसार कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन तपासीक अंमलदार पोलिस जमादार जगदीपसिंह परदेशी यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीस अटक केले. त्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हा खटला कळमनुरी येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण ९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर प्रथमवर्ग न्यायाधीश के.जी. सावंत यांनी आरोपी रमेश पंडितराव वाकडे यास कलम ३२६ भादंविअन्वये दोषी ग्राह्य धरुन एक महिना सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील आरोपी शोभाबाई वाकडे हिची सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली आहे. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. गजानन जगताप यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Breathless; Rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.