रांजणगाव रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:45 IST2019-01-11T18:45:28+5:302019-01-11T18:45:58+5:30
रांजणगाव ग्रामपंचायतीने गुरुवारी वाहतुकीला अडथळा ठरुन अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यावरील टपरी व हातगाड्यांचे अतिक्रमण हटवून रहदारीसाठी रस्ता मोेकळा केला.

रांजणगाव रस्त्याने घेतला मोकळा श्वास
वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीने गुरुवारी वाहतुकीला अडथळा ठरुन अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यावरील टपरी व हातगाड्यांचे अतिक्रमण हटवून रहदारीसाठी रस्ता मोेकळा केला.
रांजणगावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर हातगाडी व टपरी चालकांचे अतिक्रमण वाढले आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे गावातील मुख्य रस्त्यासह जोगेश्वरी, कमळापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा-अर्धा तास वाहनांच्या गर्दीत ताटकळत थांबावे लागत आहे.
पादचा-यांना तर जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते. रस्त्यावरील अतिक्रमण नागरिकांची डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामपंचायतीने गुरुवारी थेट अतिक्रमणधारकावर कारवाई करीत रस्त्यावरील हातगाडी व टपरीचे अतिक्रमण काढण्यात आले. तसेच यापुढे रस्त्यावर कोणीही हातगाडी व टपरी लावू नये, अशा सूचना व्यवसायिकांना देण्यात आल्या. यावेळी काही हाहतगाड्या जप्त करण्यात आल्या. ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने रस्ते रहदारीसाठी मोकळे झाले आहेत. मात्र ही परिस्थिती किती दिवस रहाते हे येणारा काळच ठरविल. तृर्तास तरी रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याचे दिसून येते.
हातगाडी, टपरी व अन्य अतिक्रमणामुळे रांजणागवातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्तेही पुरते जाम झाले होते. रस्त्याचा श्वास कोंडल्याने मुख्य रस्त्यासह कमळापूर व जागेगेश्वरीकडे जाणाºया रस्त्यावर कायम वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने श्वास कोंडलेल्या रस्त्यांनी बºयाच दिवसांनी मोकळा श्वास घेतला आहे.