पैठण रोडवर जलवाहिनीला भगदाड
By Admin | Updated: July 22, 2016 00:45 IST2016-07-22T00:04:05+5:302016-07-22T00:45:01+5:30
औरंगाबाद : पैठण रोडवरून औरंगाबादकडे येणाऱ्या अज्ञात जड वाहनाने १२०० मि. मी. व्यासाच्या फारोळ्याजवळील जलवाहिनीवरील व्हॉल्व्हला जोरदार धडक दिल्यामुळे जलवाहिनीला मोठे भगदाड पडून गळती लागली

पैठण रोडवर जलवाहिनीला भगदाड
औरंगाबाद : पैठण रोडवरून औरंगाबादकडे येणाऱ्या अज्ञात जड वाहनाने १२०० मि. मी. व्यासाच्या फारोळ्याजवळील जलवाहिनीवरील व्हॉल्व्हला जोरदार धडक दिल्यामुळे जलवाहिनीला मोठे भगदाड पडून गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, शहरातील सुमारे ८० टक्के वसाहतींना शुक्रवारी निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे.
शहरातील सर्व जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे पाणी साठवण करण्याचा कुठलाही पर्याय पालिकेकडे नाही. परिणामी औरंगाबादकरांना शुक्रवारी पाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. जलवाहिनीच्या वरच्या बाजूला मोठे भगदाड पडून गळती लागली आहे. ती गळती दुरुस्त करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंतचा वेळ लागणार असल्याचे औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून कळविण्यात आले आहे. गळती मोठी असल्यामुळे जायकवाडी ते फरोळ्यापर्यंत येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, फारोळा ते एमबीआरपर्यंत सुरू असलेला पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. परिणामी अनेक वसाहतींचा पाणीपुरवठा बंद झाला.