गिरीजा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीस तडे
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:31+5:302020-12-04T04:08:31+5:30
प्रकल्पाच्या मुख्य भिंतीच्या पायथ्याशी पाळू व भिंत यांच्या संगमाजवळ चार ते पाच ठिकाणी तडे जाऊन हे पाण्याचे ...

गिरीजा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीस तडे
प्रकल्पाच्या मुख्य भिंतीच्या पायथ्याशी पाळू व भिंत यांच्या संगमाजवळ चार ते पाच ठिकाणी तडे जाऊन हे पाण्याचे कारंजे उडत आहेत. यामुळे नागरिक चिंतेत पडले असून काही जणांनी याबाबत माहिती देण्यासाठी शाखा अभियंता कार्यालय गाठले मात्र, तेथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. कार्यालयाला कुलूप होते. येथे आठवड्यातून एखाददुसऱ्या वेळेस कर्मचारी येत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. गिरीजा मध्यम प्रकल्पाच्या भिंतीला गेलेल्या तड्यांची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो : गिरीजा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य भितींस तडे गेल्यामुळे उडणारे कारंजे.