शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

रिक्षाचालकांच्या मुजोरील ब्रेक; छत्रपती संभाजीनगरात ४४० रिक्षांची चौकशी, ६ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:21 IST

चौकशीसाठी पोलिस अखेर रस्त्यावर; मुख्यालयाने कुमक पाठवली, ७ महिन्यांतील तिसरी मोहीम

छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकांमधील गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंताजनक झाले आहे. हत्येपर्यंत त्यांची मजल गेली आहे. अखेर पोलिसांना जाग आली असून, वाहतूक पोलिसांच्या मदतीला मुख्यालयातील अंमलदार देत ५ तासांत तब्बल ४४० रिक्षाचालकांची कसून चौकशी करण्यात आली. यात बेशिस्त रिक्षाचालकांना ६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. गेल्या ७ महिन्यांतील ही रिक्षाचालकांविरोधातली तिसरी मोहीम आहे. मात्र, वाहतूक पोलिसांनी याही वेळेस कारवाईचा सोपस्कार केला आहे की कारवाईत सातत्य राहणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

किरकोळ कारणावरून रिक्षाचालकांकडून प्रवाशांवर चाकूहल्ला, लूटमार, महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना सतत घडत आहेत. ४ जूनला नशेखोर रिक्षाचालकाने प्रवाशाची हत्या करत गुन्हेगारीची परिसीमा दाखवून दिली. या घटनेमुळे रिक्षा व्यवसायात नव्याने उतरलेल्या गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंतेची बाब झाली आहे. शहरातील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्यासंदर्भात ‘लोकमत’ने घटनांचा आढावा घेत वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून याची गंभीर दखल घेतली गेली. अखेर मंगळवारी वाहतूक पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले गेले.

एकूण ५ तास तपास मोहीम सुरू होती. भगवान महावीर चौक, सिडको चौक, एसएफएस शाळा, व्हिट्स हॉटेल, वाळूजमध्ये एकाच वेळी मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत संपूर्ण वाहतूक पाेलिस रस्त्यावर मोहिमेसाठी उतरले हाेते. त्यांच्या मदतीसाठी मुख्यालयातील अंमलदारांची कुमक पाठवली.

४४० रिक्षाचालकांची चौकशीवाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ५ तासांच्या कारवाईत जवळपास ४४० रिक्षाचालकांची कसून चौकशी करण्यात आली. यात नियम मोडणाऱ्या चालकांकडून एकूण ६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

पिलीसांनाही जुमानत नाहीतकारवाईदरम्यान ‘लोकमत’ने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत पोलिसांसमक्ष रिक्षाचालकांची मुजाेरी पाहायला मिळाली. सिडको चौकात पोलिस समोर असतानाही रिक्षाचालक कर्कश आवाजात गाणे वाजवत जाताना दिसले. तर अनेकजण सुसाट वेगात जात होते. आकाशवाणी चाैकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना एक चालक मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत होता. पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी त्याला थांबवण्याचा इशारा केला. तरीही बेदरकारपणे चालक रिक्षा पुढे दामटत होता. या झटापटीत देवकर यांचे मनगटी घड्याळ तुटून पडले.

दंडाची भीती कोणाला?ऑनलाइन प्रक्रियेमुळे वाहतूक दंडाची भीतीच नाहीशी झाल्याचे वाहतूक पाेलिस सांगतात. अनेक रिक्षाचालक पोलिसांना दंड पाठवून द्या, असे म्हणत रिक्षा पुढे दामटतात.

पोलिस हे कधी करणार?- रिक्षाचालकांध्ये असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधासाठी पोलिसांचे काय नियोजन आहे?- रिक्षाचालकांमधील गुन्हेगारांची माहिती मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार?- रात्री कर्कश आवाजात गाणे वाजवत, सुसाट रिक्षा दामटवणाऱ्यांवर लक्ष कोण ठेवणार?- कारवाईचा केवळ सोपस्कारच बजावणार की सातत्य राहणार?

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरauto rickshawऑटो रिक्षाCrime Newsगुन्हेगारी