आळंद गावात ‘ब्रेक द चेन’चा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:05 IST2021-04-13T04:05:06+5:302021-04-13T04:05:06+5:30
आळंद : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन अर्थात ‘ब्रेक द चेन’ला आळंद येथील व्यापाऱ्यांकडून नियमांचे उल्लघंन केले जात ...

आळंद गावात ‘ब्रेक द चेन’चा उडाला फज्जा
आळंद : राज्य शासनाने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन अर्थात ‘ब्रेक द चेन’ला आळंद येथील व्यापाऱ्यांकडून नियमांचे उल्लघंन केले जात आहे. मागच्या दाराने अनेक दुकाने सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येत असून याकडे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यात नागरिकांकडून मास्क न घालता रस्त्यावर गर्दी केली जात असल्याने अंधारी गावात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मिनी लाॅकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. तरीदेखील येथील दुकाने, हॉटेल व्यावसायिक मागच्या दाराने व्यवहार सुरूच ठेवत आहेत. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारवाई होत नाही. त्याच शासनाच्या आदेशाला झुगारून हे कारनामे सुरू झाले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाईसाठी सामोरे येतात. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिंकावर कारवाई का होत नाही, प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आम्ही कारवाई करतो
अंधारी गावात होत असलेल्या उल्लंघनाबद्दल वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, आमचे कर्मचारी गावात नेहमी पाहणी करीत आहेत. त्यांच्या निदर्शनात असे आढळले तर कारवाई नक्की केली जाते. त्याचबरोबर तुम्ही नावे सांगा, आम्ही कार्यवाही करतो, असे त्यांनी सांगितले.