ब्राह्मण महासंघाची दुचाकी रॅली
By Admin | Updated: July 31, 2014 01:23 IST2014-07-31T00:50:58+5:302014-07-31T01:23:19+5:30
हिंगोली : आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

ब्राह्मण महासंघाची दुचाकी रॅली
हिंगोली : आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. नंतर जिल्हाधिकऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
सकाळी अष्टविनायक चौक, महात्मा गांधी चौक, अग्रेसन महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही रॅली विसर्जित करण्यात आली. त्यानंतर सादर केलेल्या निवेदनात ब्राह्मण युवकांना व्यवसायासाठी महामंडळाची स्थापना करावी, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी, पुरोहितांना मासिक ५ हजारांचे मानधन द्यावे, ब्राह्मण समाजाचा समावेश अॅट्रॉसिटी कायद्यात करावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
या निवेदनावर महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद बडवणे, युवक प्रदेशाध्यक्ष केशव दुबे, राजेश मोकाटे, राजु जोशी, अशिष शर्मा, प्रथमेश जामकर, संतोष सराफ, राम पाठक, अॅड. राजेंद्र पोतदार, सागर बल्लाळ, अनिल देव, स्वप्नील सोनपावले, नवल दुबे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(प्रतिनिधी)