शाखाधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

By Admin | Updated: August 7, 2014 01:29 IST2014-08-07T00:30:31+5:302014-08-07T01:29:10+5:30

हिमायतनगर : लाच स्वीकारताना जिल्हा बँकेच्या हिमायतनगर शाखाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.

The Branch Officer was caught taking bribe | शाखाधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

शाखाधिकाऱ्याला लाच घेताना पकडले

हिमायतनगर : गारपीटग्रस्तांकडून १०० रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हिमायतनगर शाखाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी ६ आॅगस्ट रोजी रंगेहाथ पकडले.
हिमायतनगर तालुक्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून शासनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हिमायतनगर शाखेला अनुदान पाठविले होते. अनुदान देण्यासाठी बँकेचे शाखा व्यवस्थापक कदम हे १००, २०० रुपयांची मागणी करीत होते. ६ आॅगस्ट रोजी कदम यांना १०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.पो़नि़ एस़जे़ माने, पोहेकॉ चंद्रकांत कदम, पो़ना़ बाबू गाजुलवार, विठ्ठल खोमणे, पोकॉ विनायक कीर्तने, पोकॉ संदीप उल्लेवार, पोना शिवहार किडे आदींनी यात सहभाग नोंदविला.(वार्ताहर)

Web Title: The Branch Officer was caught taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.