ब्राह्मण महासंघाचा गुणगौरव सोहळा
By Admin | Updated: June 27, 2017 00:25 IST2017-06-27T00:15:08+5:302017-06-27T00:25:06+5:30
नांदेड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला़

ब्राह्मण महासंघाचा गुणगौरव सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी शहरातील अंबिका मंगल कार्यालयात घेण्यात आला़ समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला़
प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अॅड़ अपर्णा रामतीर्थकर उपस्थित होत्या़ त्या म्हणाल्या, समाजाची स्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे़ कुप्रवृत्तीपासून मुलींना दूर ठेवण्यासाठी पालकांनी सजग होऊन मुलींना सुसंस्कारित बनवावे, शिवाय मुलींनीही अशा प्रवृत्तींना थारा न देता त्यापासून होणारे संभाव्य धोके त्वरित ओळखावे असे आवाहन केले़
अध्यक्षस्थानी ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी होते़ यावेळी सिनेअभिनेते शरद पोंक्षे, उदय महाजन, विश्वजित देशपांडे, गुरुद्वाराचे अधीक्षक ठाणसिंघ बुंगई, अभय देशपांडे, भा़ ग़ देशपांडे, भारत जेठवाणी, बाळू खोमणे, संयोजक निखिल लातूरकर यांची उपस्थिती होती़ अभिनेते पोंक्षे म्हणाले, देशात आर्थिक निकषावर आरक्षण असले पाहिजे़ समाज जेव्हा भरकटत जातो, दिशाहीन होतो, त्यावेळी समाजाला दिशा देण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले आहे, असे ते म्हणाले़ कार्यक्रमात विश्वासशास्त्री घोडजकर, सुषमाताई माढेकर, प्रमोद केशव देशमुख, प्रसाद देव, डॉ़ गजानन चौधरी, अभय देशपांडे, क्षेमकर कुलकर्णी यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले़ यशस्वीतेसाठी वाणी लातूरकर, जिल्हाध्यक्ष विजय जोशी, अनिल डोईफोडे, डॉ़ मुकुंद मुळे, लक्ष्मीकांत पांडे, बाळासाहेब पांडे, विश्वजित भोगले, बळवंत जोशी, गिरीश पुजारी, शैलेश लातूरकर, शरद शुक्ला आदींनी परिश्रम घेतले़