..अन् ब्राह्मणवाडीची शाळा बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:46 IST2017-08-18T00:46:47+5:302017-08-18T00:46:47+5:30
नशेखोर शिक्षकाची बदली करण्याची मागणी करूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कार्यवाही केली नाही. अनेकवेळा तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने पालक आणि गावकºयांनी विद्यार्थ्यांना बाहेरगावच्या शाळेत पाठवल्याने प्राथमिक शाळाच बंद पडली आहे.

..अन् ब्राह्मणवाडीची शाळा बंद !
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : नशेखोर शिक्षकाची बदली करण्याची मागणी करूनही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कार्यवाही केली नाही. अनेकवेळा तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने पालक आणि गावकºयांनी विद्यार्थ्यांना बाहेरगावच्या शाळेत पाठवल्याने प्राथमिक शाळाच बंद पडली आहे. तालुक्यातील ब्राह्मणवाडी गावात असा प्रकार घडल्याने बालकांच्या प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत हक्कांवर गदा आली आहे.
तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथे चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते ग्रामस्थ आणि पालकांशी अरेरावी करतात. शाळेत नशा करून येतात, अशा गावकºयांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे तशा तक्र ारी वेळोवेळी केल्या आहेत; मात्र शिक्षण विभागाने त्याची काहीही दखल घेतली नाही. शेवटी वैतागून पालक आणि ग्रामस्थांनी मुलांना मंझरी, डिघोळ, चौसाळा येथील शाळेत पाठवले. आजघडीस शाळेत एकही विद्यार्थी नाही .
शाळा बंद पाडणाºया बेजबाबदार शिक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनावर हरिदास राजगुरु , ठकसेन खाडे, त्रिंबक पौळ, राम घोगरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.