शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मगव्हाण योजना दहा वर्षांत २२५ वरून ७०२ कोटींवर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 18:58 IST

योजनेचे काम पूर्णत्वाला जाण्याऐवजी विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देजुनी निविदा रद्द केली असती, तर वाचले असते कोट्यवधीशेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी, भूसंपादन प्रक्रिया होऊनही कामाची गती वाढली नाही.

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण योजनेचे काम १० वर्षांपासून सुरू आहे. गेल्या १० वर्षांत २२२ वरून ७०२ कोटी रुपयांवर ही योजना पोहोचली आहे. खाबूगिरी आणि अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनी व रवीकिरण कन्स्ट्रक्शन्स या कंत्राटदारांनी संथगतीने काम केल्यामुळे योजनेची किंमत वाढत  गेली आहे. या दोन्ही गुत्तेदारांकडे टप्पा क्र. २ चे काम होते. 

शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी, भूसंपादन प्रक्रिया होऊनही कामाची गती वाढली नाही. योजनेचे काम पूर्णत्वाला जाण्याऐवजी विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. आता योजनेचे काम अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीने साहस इंजिनिअर्सकडे सबलेट केले असले तरी योजनेचे काम किती दिवसांत पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे. योजनेची काम रखडल्यामुळे भूसंपादनाची किंमतही वाढली. ५ कोटींऐवजी २०० कोटींपर्यंत भूसंपादनाची रक्कम गेली आहे. अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीकडे ५५ कोटींचे काम होते. १० वर्षांत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानेदेखील कंत्राटदारांनाच सहकार्य केल्याचे यातून दिसते आहे. दरम्यान, १ कोटी ५० लाख रुपयांचे लेबर पेमेंट थकलेले आहे. आठ महिन्यांपासून याबाबत निर्णय होत नाही. ब्लास्टिंग, ट्रॅक्टर,  डिझेल, सिमेंट, लेबर आदीची रक्कम कंत्राटदाराकडे थकीत आहे. या सगळ्या प्रकरणात  स्थानिकांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. 

सबलेटऐवजी निविदा काढली असती तर...सध्या योजनेची जी किंमत झालेली आहे, त्यासाठी नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया केली असती, तर ती महिन्याभरात संपली असती. स्पर्धा होऊन नवीन गुत्तेदार समोर आले असते. २०१० मध्ये २० टक्के जास्त दराने गेलेली निविदा सद्य:स्थिती पाहिली, तर २० टक्के कमी दरानेदेखील आली असती, नवीन नियमानुसार कामासाठी डेडलाईन टाकता आली असती; परंतु जुन्या कंत्राटदारांवर मेहरबानी करण्यासाठी महामंडळाने याबाबत कधी विचारच केला नाही. 

दोन कोटींच्या बिलासाठी शिफारस अंबरवाडीकर ॲण्ड कंपनीने मुदतीत काम न केल्यामुळे दोन ते अडीच कोटी रुपयांचा दंड महामंडळाने लावलेला आहे. तो दंड वसूल करण्याऐवजी सदरील कंत्राटदार कंपनीस २ कोटी रुपयांचे बिल अदा करण्याची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप शहानिशा झाली नसली तरी प्रशासकीय वतुर्ळात बोलले जात आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीfundsनिधी