महामंडळाच्या बसच्या गतीला लागेना ‘ब्रेक’
By Admin | Updated: November 20, 2014 00:48 IST2014-11-20T00:29:29+5:302014-11-20T00:48:23+5:30
पुरुषोत्तम करवा , माजलगाव ‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे.

महामंडळाच्या बसच्या गतीला लागेना ‘ब्रेक’
पुरुषोत्तम करवा , माजलगाव
‘वाट पाहीन पण बसनेच जाईल’ ही म्हण आजही ग्रामीण भागातील प्रवाशी उराशी बाळगून आहेत. मात्र आता ही म्हण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांच्या अंगलट येऊ लागली आहे. बस चालकांच्या मनमानी कारभारामुळे ते सध्या सुसाट बस चालवत आहेत. काही केल्या त्यांच्या वेगाला ‘ब्रेक’ लागत नसल्याचे दिसून येत आहे.
माजलगाव तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी महामंडळाच्या बसगाड्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. बस चालक सुसाट गाड्या चालवित असल्याने छोट्या वाहनधारकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकवेळा हे बसचालक छोट्या वाहनांना साईडही देत नसल्याचे दिसून येते. अशातच मंगळवारी पाटोदा तालुक्यातील नायगाव घाटामध्ये दोन बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये शंभरावर प्रवाशी होते. मात्र दैव बलवत्तर असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये बसगाड्यांचे नुकसान झाले असले तरी बस चालकांना मात्र याचे कुठलेही देणेघेणे नसल्याचा आरोप होत आहे. वास्तविक पाहता या बसगाड्यांचा वेग किती असावा? यावर नियम घालून देण्यात आलेले आहे. मात्र या नियमांना हे बस चालक धाब्यावर बसवत आहेत. याकडे मात्र वरिष्ठ अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. कड्यामध्येही एका वृद्धेचा दोन दिवसापूर्वी बळी गेला होता.४
या बस चालकांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास यापुढेही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे
४ठरवून दिलेल्या गतीप्रमाणेच बस चालवून प्रवाशांचा विश्वास महामंडळाने कायम ठेवावा, अशी मागणीही केली जात आहे
४वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र हाताची घडी, तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे