बी.पी.एड. अभ्यासक्रम बंद पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2016 01:35 IST2016-07-14T01:29:41+5:302016-07-14T01:35:14+5:30
औरंगाबाद : दोन वर्षांचा अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्येच्या अभावी राज्यातील सुमारे शंभर शारीरिक शिक्षण महाविद्यालयांपैकी ९० टक्के महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

बी.पी.एड. अभ्यासक्रम बंद पडण्याच्या मार्गावर
औरंगाबाद : दोन वर्षांचा अभ्यासक्रम आणि विद्यार्थी संख्येच्या अभावी राज्यातील सुमारे शंभर शारीरिक शिक्षण महाविद्यालयांपैकी ९० टक्के महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्य शासनानेही राज्यातील केवळ नऊ महाविद्यालयांनाच नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.
बी. पी. एड. अभ्यासक्रमासाठी गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी संख्या रोडावत चालली आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने अभ्यासक्रम दोन वर्षांचा केल्याने तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शारीरिक शिक्षक पदे रद्द केल्याचा हा परिणाम असल्याचा आक्षेप एकीकडे घेतला जात असतानाच राज्य सरकारच्या निर्णयामुळे या क्षेत्रात विनाअनुदानित तत्त्वावर चाललेल्या शिक्षणाच्या धंद्यालाही लगाम बसणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.
राज्यातील बी. पी. एड. अभ्यासक्रमासाठी यंदा सामायिक प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येत आहे. ५ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. राज्यातील सुमारे शंभर महाविद्यालयांत १० हजार पटसंख्या आहे. मात्र, यंदा (पान ५ वर)