शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चीनवरील बहिष्कार : औरंगाबादेतील उद्योगांना कच्च्या मालासाठी आहे अन्य देशांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 19:17 IST

औरंगाबादेतील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही 

ठळक मुद्देऔरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते.

औरंगाबाद : औरंगाबादेतील केवळ ७० ते ८० कंपन्या चीनमधून कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात करतात. मात्र, चीनमधील लॉकडाऊनच्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. त्या काळात औरंगाबादेतील उद्योगांनी अन्य देशांकडून कच्चा माल आयात केला. त्यामुळे चीनवरील बहिष्कारामुळे येथील उद्योगांवर फारसा परिणाम होणार नाही, असे मत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

अन्य देशांच्या तुलनेत चीनमधून येणारा कच्चा माल किंवा वस्तू नक्कीच स्वस्त आहेत. मात्र, त्यांचे आयुष्यमानही तेवढेच कमी आहे. चीनमधील वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर औरंगाबादेतील उद्योग व बाजारपेठेवर काही दिवस थोडाफार परिणाम जाणवेल. तसेही औरंगाबादेतील उद्योगांचे आयातीऐवजी निर्यातीचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबादेतील पाचही औद्योगिक वसाहतींतील कंपन्यांमध्ये जगभरातील विविध देशांतून वर्षाकाठी साधारणपणे दोन हजार कोटींचा कच्चा माल, मशिनरी किंवा संबंधित अन्य वस्तूंची आयात होते. यापैकी चीनमधून अवघी १० टक्के म्हणजे २०० कोटींची आयात केली जाते. चीनमधून प्रामुख्याने प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम, मेडिसिनचा कच्चा माल जास्त प्रमाणात येतो. काही स्पेअर पार्ट येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये १२ जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७६ दिवसांचा लॉकडाऊन होता. त्या काळात तेथील संपूर्ण व्यवहार बंद होते. तेव्हा औरंगाबादेतील उद्योगांनी वेगवेगळे पर्यायी मार्गही शोधले. अन्य देशांतून कच्चा माल आयात केला. स्वदेशी कच्चा मालही घेतला. मात्र, त्याची किंमत थोडी महाग पडली. त्यामुळे चीनमधील लॉकडाऊनमुळे येथील उद्योगांना देश आणि अन्य देशांतील कच्च्या मालाचे स्रोत समजले आहेत.

काही काळ टंचाई जाणवेलयासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर आपल्या देशांत काही काळ थोडी टंचाई जाणवेल. जगातील अन्य देशांतून कच्चा माल आयात करून त्या वस्तू भारतात तयार होतील. सुरुवातीला त्याची किंमतही थोडी जास्त वाटेल; पण यातूनच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची संधी आहे. भारतीय ग्राहकांनी हे समजून घेतले पाहिजे.

आॅटोमोबाईल उद्योगाकडूनही निर्यातीवर भर‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, औरंगाबादेतील बजाजसारखे आॅटोमोबाईल उद्योग आणि लहान-मोठ्या आॅटोमोबाईल वस्तू (स्पेअर पार्ट) बनविणाऱ्या उद्योगांची आयात कमी आणि निर्यातीवरच जास्त भर आहे. त्यामुळे चीनवरील बहिष्काराचा आॅटोमोबाईल उद्योगावर फारसा परिणाम होणार नाही. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायchinaचीन