घरासमोर खेळणारा मुलगा बेपत्ता
By Admin | Updated: May 17, 2017 23:38 IST2017-05-17T23:36:28+5:302017-05-17T23:38:05+5:30
बीड : अंगणात खेळणारा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना शहरातील सावतामाळी चौक भागात मंगळवारी घडली.

घरासमोर खेळणारा मुलगा बेपत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अंगणात खेळणारा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना शहरातील सावतामाळी चौक भागात मंगळवारी घडली. मुलगा अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंद झाला.
ऋषीकेश सुरेश येवले (११ रा. सावतामाळी चौक, बीड) असे त्या मुलाचे नाव आहे. तो सायंकाळी घरासमोरून खेळताना बेपत्ता झाला. सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. सुरेश येवले यांनी शहर ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाची फिर्याद नोंदवली. तपास सहायक निरीक्षक सतीश जाधव करत आहेत.