दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:06 IST2021-04-30T04:06:15+5:302021-04-30T04:06:15+5:30
अनमोल रवी वाघमारे (१४, रा. काचीवाडा, श्रीराम मंदिराजवळ) असे जखमीचे नाव आहे. शांती हॉटेलजवळून पायी जात असताना समोरून ...

दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमी
अनमोल रवी वाघमारे (१४, रा. काचीवाडा, श्रीराम मंदिराजवळ) असे जखमीचे नाव आहे. शांती हॉटेलजवळून पायी जात असताना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्याला धडक दिली. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरीत्या दारू विक्रेत्यावर कारवाई
औरंगाबाद : रोहिदासनगर येथे चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. अंशुमल चांदुमल जैन (रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. यात पावणेतीन हजारांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.
पैसे मागितल्यावरून मजुराला मारहाण
औरंगाबाद : उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून नीलेश दिलीप जावळे (३०, रा. मुकंदवाडी) यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना २८ एप्रिल रोजी मुकुंदवाडीतील स्मशानभूमीजवळ घडली. याप्रकरणी आरोपी सुखदेव पिंपळे आणि त्याचा साथीदार एकनाथ अशी आरोपींची नावे आहेत.