शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ओसंडून वाहणाऱ्या हर्सूल तलावात मुलगा बुडाला; तरुणांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:55 IST

शेकडो तरुणांची गर्दी ओसंडून वाहणाऱ्या हर्सूल तलावावर होत असून  सुरक्षारक्षक अपुरे पडत आहेत

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल तलाव दोन दिवसांपासून ओसंडून वाहत आहे. तलावाच्या सांडव्यावर पोहण्यासाठी दिवसभर शेकडो तरुण गर्दी करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी एक अल्पवयीन मुलगा सांडव्याजवळ बुडत होता. उपस्थित तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. त्याला वाचवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हर्सूल तलावाच्या सांडव्यावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी होत आहे. काही तरुण या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नव्हती. शुक्रवारी सायंकाळी पोहता येत नसलेल्या तरुणाने पाण्यात उडी मारली. काही वेळेत तो बुडू लागला. आसपासच्या तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले. तलावाच्या सांडव्यावर त्याला उलटे झोपवून पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यानंतर, त्याला उचलून पात्राजवळ नेले. तेथेही पोटातील पाणी काढले. हा तरुण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

पोहायला बंदी घालण्याची मागणीया ठिकाणी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने सुरक्षारक्षक वाढविले नाहीत. तलावावर पोहण्यासाठी बंदी घालायला हवी. निष्पाप एक-दोन तरुणांचा जीव गेल्यावर प्रशासन सुरक्षा वाढविणार का? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी केला आहे.

खासगी रुग्णालयात वेळीच उपचारहर्सूल तलावात बुडत असलेला मुलगा मिसारवाडी येथील आदिनाथ जाधव असल्याचे रात्री उशिरा समोर आले. त्याला जटवाडा रोडवरील डॉ. आबेद हाशमी यांच्याकडे नेण्यात आले. रुग्णालयात नेले तेव्हा त्याची ऑक्सिजन लेव्हल खूप कमी होती. त्याला ऑक्सिजन लावून औषधोपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी ॲम्बु बॅगद्वारे ऑक्सिजन देत घाटीत नेण्यात आल्याची माहिती डॉ. हाशमी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhersul lakeहर्सूल तलावWaterपाणी