टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली

By Admin | Updated: May 16, 2017 00:06 IST2017-05-16T00:03:49+5:302017-05-16T00:06:12+5:30

पारगाव : भरधाव वेगातील ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक महामार्गाच्या खाली गेला़

The bottom of the truck road due to the tire breaking | टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली

टायर फुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली

लोकमत न्यूज नेटवर्क
पारगाव : भरधाव वेगातील ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक महामार्गाच्या खाली गेला़ सुदैवाने मोठा अपघात टळला असून, चालक किरकोळ जखमी झाला़ हा अपघात रविवारी रात्री औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव (क़) पाटीजवळ घडला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव वेगातील ट्रक (क्ऱएम़एच़२०- सीटी८७५४) हा रविवारी रात्री भरधाव वेगात औरंगाबादहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता़ हा ट्रक महामार्गावरील पिंपळगाव (क़) पाटीजवळ आला असता अचानक टायर फुटले़ त्यावेळी चालक आसिफखान युनूस खान (वय-३५) यांचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली खड्ड्यात उतरला़ सुदैवाने मोठा अपघात टळला असून, चालक आसिफ खान युनूस खान हे किरकोळ जखमी झाले़
दरम्यान, रस्ता रूंदीकरण कामात ठिकठिकाणी पूल बांधण्यात आले. पूल व रस्त्यामध्ये अंतर असून, पुलावर लोखंडी गजही आहेत. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतल्याचे पहावयास मिळत नाही. त्यामुळे हे पूल अपघाताला निमंत्रण देत आहेत. या ट्रकचे टायर फुटल्याने त्या पुलावरुन आदळून रस्त्याच्या खाली गेला़ अपघाताचे प्रमाण पाहता ठेकेदारांनी नवीन पुलावर सुरक्षेचे उपाय करावेत, अशी मागणी चालकांमधून होत आहे़

Web Title: The bottom of the truck road due to the tire breaking