फुलंब्रीतील दोघांचे प्रेत सापडले रोटेगाव स्टेशनवर

By Admin | Updated: March 29, 2016 00:54 IST2016-03-29T00:14:42+5:302016-03-29T00:54:59+5:30

वैजापूर : रोटेगाव रेल्वेस्टेशन परिसरात सोमवारी सकाळी फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथील दोन तरुण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Both of the victims were found dead at the Rotegaon station | फुलंब्रीतील दोघांचे प्रेत सापडले रोटेगाव स्टेशनवर

फुलंब्रीतील दोघांचे प्रेत सापडले रोटेगाव स्टेशनवर


वैजापूर : रोटेगाव रेल्वेस्टेशन परिसरात सोमवारी सकाळी फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथील दोन तरुण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांची हत्या करण्यात आली अथवा हा आत्महत्येचा प्रकार आहे, याबाबतचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही.
गणेश लक्ष्मण नजन (२७) आणि रोहिदास बबन बकाल (२८, दोघे रा. वारेगाव, ता. फुलंब्री) अशी मृत तरुणांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, रोटेगाव रेल्वे स्टेशनजवळ परसोड्याच्या दिशेने सिग्नलपासून साठ फूट अंतरावर गणेश आणि रोहिदास मृतावस्थेत पडलेले असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. त्यांच्या हातावर घरच्यांचे मोबाईल नंबर लिहिलेले होते. या घटनेची माहिती रोटेगावच्या स्टेशन मास्तरांनी औरंगाबाद रेल्वे पोलीस स्टेशनला कळविली. त्यानंतर रेल्वे पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
सहायक पोलीस निरीक्षक ए.डी.कुशंगवाड, एम. वाय.पठाण, संजय राऊत, पी. बी. गव्हाणे, माणिक आचार्य यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सुधीर गिते यांनी त्या तरुणांचे शवविच्छेदन केले. मृतांच्या हातावरील मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला. त्यांनतर गणेश याचे वडील, भाऊ, तसेच रोहिदासचे नातेवाईक वैजापूर येथे दाखल झाले. त्यावेळी त्यांना शोक अनावर झाला होता.
गणेश व रोहिदास यांच्याकडे आडवे बोअर घेण्याचे मशीन होते. ते विहिरीत आडवे बोअर मारून देण्याचा व्यवसाय करायचे. होळीच्या आदल्या दिवशी ते जेजुरीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: Both of the victims were found dead at the Rotegaon station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.