‘त्या’ दरोड्यातील दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 00:50 IST2016-07-12T00:37:44+5:302016-07-12T00:50:56+5:30

भोकरदन : कुंभारी पाटीजवळील दरोडा प्रकरणातील दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आणखी तीन ते चार आरोपी फरारच असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Both of those 'dacoits' stalled | ‘त्या’ दरोड्यातील दोघे अटकेत

‘त्या’ दरोड्यातील दोघे अटकेत


भोकरदन : कुंभारी पाटीजवळील दरोडा प्रकरणातील दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आणखी तीन ते चार आरोपी फरारच असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
मंजुर रसूल पिंजारी (रा.नाचनवेल ता़ कन्नड) राजकुमार प्रजापती (रा़ सिन्नर जि़नाशिक) असे पकडलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. भोकरदन - जालना रोडवरील कुंंभारीपाटी जवळील एका गोडाऊनच्या परिसरात अज्ञात चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यामध्ये या ठिकाणचे ४ लाख ९० हजार रूपये किंमतीचे कंन्डक्टर वायरच्या बंडलाची चोरी केली होती. मात्र गाडी बिघडल्यामुळे हे सामान नेण्यास त्यांना अपयश आले होते. सामान टाकून त्यांनी पोबारा दिला होता. या प्रकणात भोकरदन पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पकडलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता मंजुर पिंजारी याची हर्सूल कारागृहात रवानगी केली असून, राजकुमार प्रजापती याला पोलिस कोठडी सुनावली आहे. तीन ते चार आरोपींचा शोध सुरू असून संशयीतांची नावे समजली आहेत.

Web Title: Both of those 'dacoits' stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.