दोघे वाळूमाफिया पोलीस ठाण्यातून पसार

By Admin | Updated: April 15, 2017 00:33 IST2017-04-15T00:30:23+5:302017-04-15T00:33:30+5:30

अंबड : अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात अंबडचे तहसीलदार डी.एन.भारस्कर यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Both of them pass through the Woolmafia police station | दोघे वाळूमाफिया पोलीस ठाण्यातून पसार

दोघे वाळूमाफिया पोलीस ठाण्यातून पसार

अंबड : अवैध वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांविरोधात अंबडचे तहसीलदार डी.एन.भारस्कर यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तहसीलदारांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूककरणाऱ्या तीन हायवा ट्रक पकडून अंबड पोलीस ठाण्यात जमा केले. या तिन्ही वाहनांच्या मालक व चालकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, दोन ट्रक चालक पोलिसांसमक्ष पसार झाल्याने खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे तीन हायवा ट्रकअंबड पोलीस ठाणे आवारात लावत असतानाच तहसीलदारांना गोदापात्रात आणखी काही हायवा ट्रक अवैध वाळू तस्करीसाठी गोदापात्राकडे निघाल्याची माहिती मिळाली. तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांना पोलीसांत फिर्याद नोंदविण्याचे आदेश देऊन पथकासह गोदापात्राकडे रवाना झाले. सुखापुरी-तीर्थपुरी रोडवरील सुखापुरी गावाजवळील पुलावर गाडी लावून वाळू वाहतूक करणाऱ्या (एम.एच.४६-एफ.५८७१),(एम. एच. २०-ई.जी.५७९९), (एम.एच.२०-डी.ई.९८८२), (एमएच २० डीई ३२०४) या चार ट्रकवर कारवाई करून अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. (वार्ताहर)

Web Title: Both of them pass through the Woolmafia police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.