औरंगाबाद मध्यमधून दोघांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: September 24, 2014 01:05 IST2014-09-24T00:57:06+5:302014-09-24T01:05:59+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मंगळवारी दोघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.

औरंगाबाद मध्यमधून दोघांचे अर्ज दाखल
औरंगाबाद : औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मंगळवारी दोघा जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेख रफिक शेख रज्जाक यांनी नॅशनल पीपल्स पार्टीच्या वतीने, तर मोबिनोद्दीन खदिरोद्दीन सिद्दीकी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून मात्र मंगळवारी एकही अर्ज दाखल झाला नाही.
शनिवार आणि सोमवार अशा दोन दिवसांत जिल्ह्यात तब्बल ३२५ इच्छुकांनी ७१२ नामनिर्देशनपत्रे घेतली. आज मंगळवारीही हा ओघ सुरूच राहिला. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून मंगळवारी पुन्हा २३ जणांनी ३५ अर्ज घेतले, तर शेख रफिक रज्जाक आणि मोबिनोद्दीन खदिरोद्दीन सिद्दीकी या दोघांनी अर्ज दाखल केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयातूनही १५ जणांनी २९ अर्ज नेले. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात १४ इच्छुकांनी ३४ अर्ज घेऊन गेले.
कन्नड, फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर या मतदारसंघांत मंगळवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सिल्लोड मतदारसंघात २ अर्ज दाखल झाले.
सिल्लोड मतदारसंघात ६ जणांनी १७, कन्नडमध्ये ७ जणांनी १९, फुलंब्री मतदारसंघात ११ जणांनी १९, पैठण मतदारसंघात ८ जणांनी १८, गंगापूर मतदारसंघातून १३ जणांनी २२ आणि वैजापूर मतदारसंघातून २ जणांनी ६ अर्ज नेले. मंगळवारी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत एकूण ९९ जणांनी १९९ अर्ज नेले.