गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
By Admin | Updated: July 6, 2015 00:19 IST2015-07-05T23:54:58+5:302015-07-06T00:19:26+5:30
लातूर : लातूर शहर व तालुक्यातील रामेगाव येथे विविध घटनेत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ याबाबत एमआयडीसी पोलिस ठाणे व गातेगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद आहे़

गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
लातूर : लातूर शहर व तालुक्यातील रामेगाव येथे विविध घटनेत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ याबाबत एमआयडीसी पोलिस ठाणे व गातेगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद आहे़
पोलिसांनी सांगितले, लातूर येथील अंबाजोगाई रोडवरील एलआयसी आॅफिससमोर राहणाऱ्या राजेंद्र विक्रम हाके (वय २२) या युवकाने स्वत:च्या राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या रुममध्ये लोखंडी आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याबाबत ३ जुलै रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद आहे़ पुढील तपास पोउपनि घोडके करीत आहेत़
दुसऱ्या घटनेत लातूर तालुक्यातील रामेगाव येथील अर्जुन भीमराव कशीकर (वय ६५) या व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना ३ जुलै रोजी रात्री ९ वाजेपूर्वी रामेगाव येथे घडली़ याबाबत गातेगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ पुढील तपास पोहेकॉ अळागड्डे करीत आहेत़ (प्रतिनिधी)