पैशावरून दोघांना बेदम मारहाण
By Admin | Updated: July 7, 2016 00:09 IST2016-07-07T00:05:50+5:302016-07-07T00:09:10+5:30
परंडा : पैसे देण्याच्या कारणावरून दोघांना शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना परंडा ते पाचपिंपळा रस्त्यावर मंगळवारी घडली.

पैशावरून दोघांना बेदम मारहाण
परंडा : पैसे देण्याच्या कारणावरून दोघांना शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना परंडा ते पाचपिंपळा रस्त्यावर मंगळवारी घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथील कासीम बाग भागात राहणारे बालाजी चितरंज्या पवार व त्यांचे चुलत भाऊ अजय पवार यांना बुधवारी परंडा ते पाचपिंपळा रस्त्यावर आरोपितांनी ‘तुम्ही आमचे पैसे का देत नाही’, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच डोक्यात दगडाने मारून जखमी केले, अशी फिर्याद बालाजी पवार यांनी दिली. यावरून परंडा पोलिस ठाण्यात संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस हवालदार जगताप करीत आहेत. (वार्ताहर)