वाटुर फाटा : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील एक दुकान फोडून ५६ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना वाटूर चौकी पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले आहे.वाटूर येथील किशोर अग्रवाल यांच्या किराणा दुकानाचे पत्रे उचाकावून १४ आॅगस्ट रोजी मध्य रात्री चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला होता. दुकानातील रोख १७ हजार ५०० रूपये, सीसीटीव्हीची डी.व्ही. आर. असे एकूण ५६ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केला होता.याप्रकरणी १५ आॅगस्ट रोजी वाटूर चौकीत गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक विद्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे कॉ. आर. के. जाधव, नापोका दीपक ढवळे,पोकॉ. राजू राठोड यांनी २४ तासांत गुन्हा उघडकीस आणून अशोक महादेव बरकुले व प्रकाश राशनकर या दोघांना मुद्देमालासह अटक केली. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}