शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दोघेही विवाहित मात्र प्रेम जुळले; एकत्र येता येत नसल्याने पती-पत्नी, मुलांना सोडून संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 18:36 IST

Married Couple Commit Suicide : सीमा कांबळे आणि सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते.

ठळक मुद्दे पती-पत्नी, मुलांना सोडून प्रेमीयुगूलाने घेतला गळफासएकाच साडीने दोघांनी कवटाळले मृत्यूला

औरंगाबाद: दोघेही अन्यत्र विवाहित असतांना त्यांचे प्रेम जुळून आले. या विवाहबाह्य संंबंधांतून त्या प्रेमीयुगुलाने एकाच साडीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. ही सनसनाटी घटना हर्सूल परिसरातील एकतानगरात मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास समोर आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. यातील प्रेयसीच्या मागे तीन मुले व पतीसह अन्य कुटुंबिय आहेत. तर प्रियकराच्या मागे पत्नी व अन्य कुटुंब आहे. ( lover man n women commit suicide leaving their children, Husband and wife behind) 

याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सीमा ईश्वर कांबळे (३५, रा.एकतानगर, हर्सूल) आणि सचिन गंगाधर पेटारे (२७, रा.एन १३, वानखेडेनगर, हर्सूल ) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सीमा कांबळे आणि सचिन हे जवळच्याच वसाहतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते. सचिनचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर सीमाला १२ व ६ वर्षाच्या मुली आणि ९ वर्षाचा मुलगा अशी ३ अपत्य आहेत. तीचा पती खाजगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. सीमा आणि सचिन यांचे गेल्या काही वर्षापासून मित्रत्वाचे संबंध होते. लग्न झाल्यानंतरही त्याचे सीमाच्या घरी येणेजाणे होते. मंगळवारी सकाळी सीमाचा पती कामावर गेला होता. तर सचिनही जेवणाचा डबा घेऊन कामावर जातो, असे घरी सांगून निघाला. 

काम न मिळाल्याने तो सीमाच्या घरी गेला. तेव्हा सीमाची तिन्हे मुले घरी होती. सचिन तेथे गेल्यावर दोन्ही मुली आणि मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेले. सीमा आणि सचिन यांनी अचानक खोलीचे दार आतून बंद करून घेत छताच्या हुकाला साडी बांधली. साडीच्या एका पदराने सीमा तर दुसऱ्या पदराने सचिनने गळफास घेऊन आत्महत्या केली. ११.३० वाजेच्या सुमारास सीमाचा मुलगा आणि मुली घरी परतल्या तेव्हा त्यांना घराचे दार आतून बंद दिसले. आवाज देऊन आणि दार ठोठावूनही आई दार उघडत नसल्याने त्यांनी रडतच घरमालक आणि शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. घरमालकाने दार ठोठावून पाहिले मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. दाराच्या फटीतून आत पाहिले असता सीमा आणि सचीन लटकलेले दिसले. त्यांनी सीमाच्या पतीला आणि हर्सूल पोलिसांना फोन करून तेथे बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ, उपनिरीक्षक गिरी, हवालदार पालवे, काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दार तोडले असता सीमा आणि सचिन यांनी एकाच साडीला गळफास घेतलेला दिसला. त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सीमाच्या मुलांनी फोडला हंबरडासीमा आणि सचिन यांनी गळफास घेतल्याचे घरमालकाने पाहिल्यानंतर त्यांनी आणि शेजाऱ्यांनी तिच्या मुलांना तेथून दुसरीकडे नेले. मात्र काहीतरी अघटीत घडल्याचे मुलांच्या लक्षात आले व त्यांनी हंबरडा फोडला. काही वेळाने वडिल व नातेवाईकांसोबत घाटीत आलेल्या एका मुलाने वडिलांना बिलगून हंबरडा फोडला. यामुळे वातावरण गंभीर बनले होते.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी