दोघांचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: October 6, 2014 00:13 IST2014-10-06T00:10:56+5:302014-10-06T00:13:26+5:30
उमरगा : एका आठ वर्षीय मुलाचा तळ्यातील पाण्यात तर एका युवकाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या दूर्दैवी घटना शनिवारी चिंचोली, चिंचोली (ज़ ता़उमरगा) शिवारात घडल्या असून,

दोघांचा बुडून मृत्यू
उमरगा : एका आठ वर्षीय मुलाचा तळ्यातील पाण्यात तर एका युवकाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या दूर्दैवी घटना शनिवारी चिंचोली, चिंचोली (ज़ ता़उमरगा) शिवारात घडल्या असून, या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील पळसगाव तांडा येथील रितेश मोहन चव्हाण या मुलाचा चिंचोली शिवारातील पाझर तलावाच्या पाण्यात शनिवारी दुपारी ते सायंकाळच्या दरम्यान बुडून मृत्यू झाला़ याबाबत ज्ञानेश्वर राठोड (रा़पळसगाव तांडा) यांनी दिलेल्या माहितीवरून उमरगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास पोहेकॉ गव्हाळे हे करीत आहेत़
उमरगा तालुक्यातील चिंचोली (ज) येथील ज्ञानेश्वर बनसोडे (वय-१९) हा युवक शनिवारी सायंकाळी गावातील अशोक सुरवसे यांच्या शेतातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेला होता़ त्यावेळी त्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला़ याबाबत सुहास पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून उमरगा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ या घटनेचा अधिक तपास पोहेकॉ लोखंडे हे करीत आहेत़
(प्रतिनिधी)