दुचाकी आणि जीप चोरणारे दोघे ताब्यात
By Admin | Updated: June 23, 2016 01:05 IST2016-06-23T00:14:24+5:302016-06-23T01:05:22+5:30
जालना : शहरातील माळीपुरा येथील संशयित आरोपी अल्ताफअली हमीद अली पिंजारी आणि सय्यद कैसर याच्याकडून शहरातील विविध ठिकाणावरून बनावट चावीच्या सहाय्याने

दुचाकी आणि जीप चोरणारे दोघे ताब्यात
जालना : शहरातील माळीपुरा येथील संशयित आरोपी अल्ताफअली हमीद अली पिंजारी आणि सय्यद कैसर याच्याकडून शहरातील विविध ठिकाणावरून बनावट चावीच्या सहाय्याने चोरी केलेल्या दहा दुचाकी आणि एक जीप विशेष पोलिस पथकाने कारवाई करत बुधवारी ताब्यात घेतल्या.
गैबी नागरे यांची दुचाकीची (एम. एच २१ के ३७७७) २१ जून रोजी त्यांच्या घरासमोरून चोरट्याने लांबविली होती. याबाबत नागरे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात होत असलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढत असल्याची दखल घेत पोलिस अधीक्षक ज्योतीप्रियासिंह यांनी या प्रकणाचा छडा लावण्यासाठी विशेष पोलिस पथकाकडे तपास दिला. विशेष पोलिस पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी शहरात आणि परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीचा अभ्यास करून माळीपुरा येथील अल्ताफअली हमीदअली पिंजारी आणि सय्यद कैसर या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच अल्ताफ आणि सय्यद याने शहरासह विविध ठिकाणावरून चोरलेल्या दहा दुचाकी किमंत १ लाख ८० हजार रूपये आणि एक जीप किंमत ४ लाख रूपये असा ५ लाख ८० हजार रुपये किंमतीची वाहने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. अशा प्रकारच्या चोऱ्या शहरासह कोठे केल्या याचा पोलिस तपास करणार असल्याचे विशेष कृती पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक ज्योतीप्रियासिंह, अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, एलसीबीचे अनंत कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली.