दुचाकी-कार अपघातात दोघे गंभीर
By Admin | Updated: November 30, 2015 23:29 IST2015-11-30T23:15:28+5:302015-11-30T23:29:59+5:30
वाटूरफाटा : येथून पाच कि़मी. अंतरावर असलेल्या जालना-वाटूर महामार्गावरील एदलापूर पाटीवर दुपारी दीड वाजेच्या सुमारास कार व दुचाकी अपघातात दोन्ही

दुचाकी-कार अपघातात दोघे गंभीर
वाटूरफाटा : येथून पाच कि़मी. अंतरावर असलेल्या जालना-वाटूर महामार्गावरील एदलापूर पाटीवर दुपारी दीड वाजेच्या सुमारास कार व दुचाकी अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
जालन्याहून नांदेडला जाणारी कार महामार्गावर येण्यासाठी वळण घेत असताना दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील चालक कुंडलिक मोरे हे गंभीर जखमी झाले. तर कारमध्ये असलेले भास्कर तिरडेकर, त्यांच्या पत्नी शैला तिरडेकर हेही जखमी झाले. सर्व जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. अपघात घडल्यानंतर पांगरी गोसावी येथील अंकुश पवार यांनी रुग्णवाहिकेला १०८ नंबरवरून कॉल करून तात्काळ बोलावून घेतले. परंतु रुग्णवाहिका उशिराने आली. याबाबत रुग्णवाहिका चालकाला विचारणा केली असता त्याने मंठा तालुक्यातील आकणी येथे कॉल असल्यामुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले. (वार्ताहर)