तालुक्यात १०२ शाळांवर पुस्तके पोहोचली

By Admin | Updated: June 12, 2014 01:38 IST2014-06-12T01:03:59+5:302014-06-12T01:38:33+5:30

वाशी : पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कुठलेही बालक केवळ पुस्तकाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना करण्यात आली

Books reached 102 schools in the taluka | तालुक्यात १०२ शाळांवर पुस्तके पोहोचली

तालुक्यात १०२ शाळांवर पुस्तके पोहोचली

वाशी : पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कुठलेही बालक केवळ पुस्तकाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना करण्यात आली असून, याअंतर्गत तालुक्यातील १०२ शाळांत विद्यार्थ्यांना वाटप करावयाची पुस्तके पोहोंच करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी के. आर. शेख यांनी दिली.
पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि अनुदानीत खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. विभागीय पाठ्यपुस्तके भांडार (बालभारती लातूर) येथून ही पुस्तके उपलब्ध झाली असून, तालुक्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या एकूण १०२ शाळांत मे महिन्याअखेर ती पोहोंचही झाली आहेत. या पुस्तकांवर शाळेतून ‘सर्व शिक्षा अभियान मोफत पाठ्यपुस्तके योजना सन २०१४-१५’ असा शिक्का शाळेत मारला जाईल. यानंतर पदाधिकारी, अधिकारी व पालक यांच्या उपस्थितीत शाळेचा पहिला दिवस ‘पुस्तक दिवस’ म्हणून साजरा करून याचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
दरम्यान, विस्ताराधिकारी आर. सी. भट्टी, आर. बी. कांबळे, जे. एस. रणदिवे, एन. के. नांदे, के. एस. पांचाळ, आर. एम. सालमोटे तसेच सर्व मोबाईल शिक्षकांनी शाळास्तरावर पाठ्यपुस्तके पुरविण्यासाठी परिश्रम घेतल्याचे शेख यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
बाजारात गर्दी
शाळा सुरू व्हायला केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात पालकांची गर्दीही वाढू लागल्याचे दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शालेय साहित्याच्या किंमती वाढल्या आहेत.

Web Title: Books reached 102 schools in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.