‘ड्युरोव्हॉल्स’मध्येही झाले बोनसचे वांधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 01:02 IST2016-10-26T00:49:22+5:302016-10-26T01:02:11+5:30

औरंगाबाद : व्हेरॉक ग्रुपशी संबंधित असणाऱ्या ड्युरोव्हॉल्स या कंपनीतही बोनसचे वांधे सुरू झाले आहेत. व्यवस्थापनाने देऊ केलेला बोनस कामगार संघटनेने फेटाळला असून,

Bonuses are also used in 'durowalls' | ‘ड्युरोव्हॉल्स’मध्येही झाले बोनसचे वांधे

‘ड्युरोव्हॉल्स’मध्येही झाले बोनसचे वांधे


औरंगाबाद : व्हेरॉक ग्रुपशी संबंधित असणाऱ्या ड्युरोव्हॉल्स या कंपनीतही बोनसचे वांधे सुरू झाले आहेत. व्यवस्थापनाने देऊ केलेला बोनस कामगार संघटनेने फेटाळला असून, नवीन अध्यादेशानुसार वाढीव बोनसची मागणी केली आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या ड्युरोव्हॉल्स इंडिया प्रा. लि. या कंपनीत दोन कामगार संघटना अस्तित्वात आहेत. ड्युरोव्हॉल्स केजरीवाल एम्प्लॉईज युनियन या अंतर्गत संघटनेचे १७६ कर्मचारी सभासद आहेत, तर पँथर पॉवर कामगार संघटनेच्या सभासदांची संख्या ४१ आहे.
एम्प्लॉईज युनियनच्या कामगारांनी मंगळवारी कामगार उपआयुक्त कार्यालय गाठून कैफियत मांडली तसेच निवेदन सादर केले.
बोनसबाबत संघटनेची गेल्या १५ दिवसांपासून व्यवस्थापनाशी चर्चा सुरूआहे. नवीन (पान २ वर)४
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ‘शॉक अ‍ॅब्ज’ बनविणाऱ्या ‘इंड्युरेन्स’ कंपनीने आज दावा केला की, कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना १५ आॅक्टोबरलाच १६,८०० रुपये बोनस देण्यात आला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष एस. एन, महाजन यांनी कामगारांना बोनस न देण्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. दुसरीकडे महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे सचिव रामकिशन शेळके यांच्याशी संपर्क केला असता ते बैठकीत व्यस्त असल्याचे सांगत आपली बाजू टाळत राहिले. नव्या कायद्यात किमान बोनससंदर्भात उल्लेख केलेल्या बोनसवरुन कंपनीचा वाद समोर आला आहे.

Web Title: Bonuses are also used in 'durowalls'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.