शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या प्राणिसंग्रहालयात वाघांच्या मिलनावर बंधने

By admin | Updated: January 4, 2016 00:21 IST

सुनील कच्छवे ,औरंगाबाद एकीकडे वाघांची संख्या वाढविण्यासाठी जगभरात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. व्यापक प्रमाणावर मोहिमा राबविल्या जात आहेत. तर दुसरीकडे औरंगाबादेत मात्र,

सुनील कच्छवे ,औरंगाबादएकीकडे वाघांची संख्या वाढविण्यासाठी जगभरात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. व्यापक प्रमाणावर मोहिमा राबविल्या जात आहेत. तर दुसरीकडे औरंगाबादेत मात्र, नेमकी उलट परिस्थिती आहे. पालिकेच्या प्राणिसंग्रहालयात चक्क वाघांची संख्या वाढू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. त्यासाठी दोन वर्षांपासून येथील वाघांच्या मिलनावर बंधने घालण्यात आली आहेत. प्रजनन थांबविण्यासाठी नर आणि मादींना जाणीवपूर्वक वेगळे ठेवण्यात येते. शहरातील मनपाचे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय हे मराठवाड्यातील एकमेव आहे. त्यात इतर प्राण्यांप्रमाणेच वाघ, हत्ती, सिंह यांचाही समावेश आहे. जगभरात वाघांची संख्या घटत असताना या प्राणिसंग्रहालयात मात्र, वाघांची संख्या येथे चांगलीच वाढली आहे. कधी काळी चंदीगडहून पट्टेदार (पिवळा) वाघांची एक आणि ओरिसातून पांढऱ्या वाघांची एक जोडी, असे एकूण चार वाघ येथे आणण्यात आले होते. त्यांना झालेल्या पिल्लांमुळे वाघांच्या संख्येत सतत भर पडत गेली. आतापर्यंत या प्राणिसंग्रहालयात वाघांची एकूण १२ पिल्ले जन्माला आली. सध्या येथे ९ पट्टेदार (पिवळे) आणि ३ पांढरे, असे १२ वाघ आहेत. शिवाय इंदौर, बोरीवली, पुणे आदी ठिकाणच्या प्राणिसंग्रहालयांना आतापर्यंत ६ वाघ देण्यात आले आहेत. प्राणिसंग्रहालयाची क्षमता पाहता येथे ८ पेक्षा अधिक वाघ ठेवता येत नाहीत. तरीही सध्या १२ वाघ आहेत. म्हणून आता आणखी संख्या वाढू नये याची काळजी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून घेतली जात आहे. वाघीण एका वेळी १ ते ५ दरम्यान पिल्ले देते. आतापर्यंत येथे एकाच वेळी एका वाघिणीने जास्तीत जास्त चार पिल्ले दिलेली आहेत. त्यामुळे एखादी वाघिणीने पिल्ले जन्माला घातली तर एवढी पिल्ले ठेवायची कुठे, असा प्रश्न मनपासमोर आहे. म्हणून दोन वर्षांपासून नर आणि मादींना वेगवेगळे ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे एकत्र येऊ नयेत, त्यांचे मीलन होऊ नये याची काळजी घेतली जाते. आतापर्यंत जन्मलेल्या वाघांची संख्या पाहता औरंगाबादेतील वाघांचा प्रजनन दर इतर भागांच्या तुलनेत चांगला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.