बॉलिवूडचा हीरो नंबर वन औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:39+5:302020-12-17T04:26:39+5:30
औरंगाबाद : मुंबईहून आलेले प्रवासी विमानतळाबाहेर पडत होते. तेवढ्यात बॉलिवूड अभिनेता गोविंदा येताना दिसला आणि विमानतळावरील प्रत्येक ...

बॉलिवूडचा हीरो नंबर वन औरंगाबादेत
औरंगाबाद : मुंबईहून आलेले प्रवासी विमानतळाबाहेर पडत होते. तेवढ्यात बॉलिवूड अभिनेता गोविंदा येताना दिसला आणि विमानतळावरील प्रत्येक जण त्याच्या दिशेने धावतात. विमानतळावर शनिवारी गोविंदाच्या आगमनाने वेगळाच रंग भरला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गोविंदा औरंगाबादमार्गे रवाना झाला. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गोविंदाचे विमानतळावर आगमन झाले. मास्क, फेस शिल्ड लावून गोविंदा विमानतळाच्या इमारतीत पोहोचला. काही प्रवासी आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले व सेल्फी घेण्यासाठी धाव घेतली. चाहत्यांनी सेल्फीसाठी केलेल्या विनंतीला मान देत गोविंदाने काही वेळेसाठी मास्क, फेश शिल्ड काढून चाहत्यांसोबत फोटो काढले. त्यानंतर गोविंदा विमानतळाबाहेर पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.