शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

विद्यापीठ प्रशासनाचा धाडसी निर्णय; ठाण मांडून बसलेल्या मठाधीश कर्मचाऱ्यांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 5:46 PM

संघटनेच्या बळावर या कर्मचाऱ्यांनी मनमानी चालवली होती.

ठळक मुद्देबदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी होत्या. बदलीचा दुसरा  टप्पा लवकरच

औरंगाबाद : आपल्याशिवाय विभाग चालूच शकत नाही, असा गैरसमज निर्माण करून वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मठाधीश झालेल्या काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धाडसी निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. मंगळवारी स्थायी २१ आणि रोजंदारीवरील १० अशा एकूण ३१ कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या २१ स्थायी कर्मचाऱ्यांमध्ये ६ कक्ष अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

झाले असे की, बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी होत्या. संघटनेच्या बळावर या कर्मचाऱ्यांनी मनमानी चालवली होती. दुसरीकडे, एकाच विभागात तीन किंवा त्यापेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करावी, असा सरकारी नियम आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने या बदल्याही केल्या होत्या; परंतु विभागप्रमुखांकडून अभय मिळाल्यामुळे ते कर्मचारी त्याच ठिकाणी कार्यरत होते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे काही कर्मचाऱ्यांच्या हेकेखोरपणाबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कोणत्या विभागात कोणता कर्मचारी कधीपासून काम करतो, त्याचा आढावा घेतला. तेव्हा हा प्रकार समोर आला. कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी पहिल्या टप्प्यात २१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले, तर कंत्राटदार संस्थेमार्फत तैनात १० रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 

बदलीचा दुसरा  टप्पा लवकरचयासंदर्भात कुलसचिव डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले की, या बदल्यांना फार विलंब झाला आहे. त्याअगोदरच व्हायला पाहिजे होत्या. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर त्या लांबणीवर पडल्या. आज पहिल्या टप्प्यात २१ स्थायी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, बदल्यांचा दुसरा टप्पाही लवकरच अपेक्षित आहे.

कर्मचाऱ्यांच्या कोठून कुठे झाल्या बदल्याकक्ष अधिकारी पी. एन. निकम- राष्ट्रीय सेवा विभाग, बी. एन. फड - कुलसचिव कार्यालय,  ए. ए. वडोदकर -सांख्यिकी विभाग, जी. जी. खरात - लेखा विभाग, वाय. एस. शिंदे -आस्थापना, डॉ. ए. यू. पाटील -पीएच.डी. विभाग. लघुलेखक ए. एम. वाघ -सामान्य प्रशासन विभाग, वरिष्ठ सहायक व्ही. जी. दरबस्तवार - परकीय भाषा विभाग,  ए. टी. खामगावकर - लेखा विभाग, एस. आर. सरवदे -पीजी विभाग,  ए. बी. मिसाळ - पीजी विभाग, आर. जी. कांबळे - म. फुले- डॉ. आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्र,  एम. आर. वाणी -  युनिक विभाग,  एस.जी. पगडे - शारीरिक शिक्षण विभाग, कनिष्ठ सहायक एन. व्ही. पाडमुख - पीजी विभाग, भांडारपाल एस. बी. जगदाळे - मध्यवर्ती भांडार येथे यांच्यासह पाच शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणTransferबदली