शरद साखर कारखान्याचे बॉयलर १५ वर्षांनंतर पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:24 IST2018-01-12T23:23:57+5:302018-01-12T23:24:02+5:30
पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी आजचा दिवस सोन्याचा ठरला. शुक्रवारी शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन झाले.

शरद साखर कारखान्याचे बॉयलर १५ वर्षांनंतर पेटले
लोकमत न्यूज नेटवर्क
विहामांडवा : पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी आजचा दिवस सोन्याचा ठरला. शुक्रवारी शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन झाले. अवघ्या दोन महिन्यांतच कारखान्याचे अध्यक्ष संदीपान भुमरे यांनी कारखाना सुरू केल्याने शेतकरी आनंदी झाले असून, तब्बल १५ वर्षांनंतर विकासाची आणखी एक वाट खुली झाली आहे.
याप्रसंगी कारखाना अध्यक्ष आ. संदीपान भुमरे, उपाध्यक्ष माणिकराव थोरे, संचालक सुरेश चौधरी, विष्णू नवथर, संपत गांधले, रावसाहेब घावट, महावीर काला, लहू डुकरे, ज्ञानोबा बोडखे, सुभाष गोजरे, नंदू पठाडे, सुभाष चावरे, भरत तवार, कल्याण धायकर, द्वारकाबाई काकडे, सोमनाथ परदेशी, कार्यकारी संचालक नामदेव बावडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हैदराबादचे मणियार यांना हा कारखाना चालविण्यासाठी दिला आहे. दहा-बारा दिवसात कारखाना सुरू होणार असल्याची माहितीही आ. भुमरे यांनी दिली. कार्यक्रमास सभासद, शेतकरी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.