शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील मतपेट्यांचे गुढ उकलेना

By admin | Updated: November 10, 2014 01:16 IST

जालना : शहरात दहा मतपेट्या आढळून आलेल्या घटनेचे गांभीर्य विचारात न घेता महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या दिवशी सुटीचा आनंद घेण्यातच वेळ घातला.

जालना : शहरात दहा मतपेट्या आढळून आलेल्या घटनेचे गांभीर्य विचारात न घेता महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शनिवार, रविवार या दिवशी सुटीचा आनंद घेण्यातच वेळ घातला. मात्र या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या पेट्या कोणत्या निवडणुकीच्या आहेत, याविषयीची चर्चा रंगत आहे. कदीम जालना पोलिसांनी पंचनामा करून सदर दहा मतपेट्या तहसीलच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. पोलिसांनी पंचनामा करतांना पेट्या बांधण्यासाठी वापरण्यात येणारे दोन कपडे आढळून आले होते. त्याची नोंद पंचनाम्यात घेण्यात आली नाही. हे कपडे मतपेटी सील करून बांधून ठेवण्यासाठी वापरण्यात येतात. एका उघड्या पेटीत कागद जाळण्यात आल्याने पेटी पूर्णत: काळवंडलेली होती. ही नोंद घेण्यात आली आहे. बीट जमादार मोरे पाटील यांनी सांगितले, कपडा जप्त करण्यात आला नाही. दहा पेट्यांमध्ये एक उघडी होती. दोन चेपलेल्या होत्या. उर्वरित सात पेट्या बंद स्थितीत होत्या. मात्र त्यात काहीच नव्हते. सर्वच पेट्या रिकाम्या होत्या. पेटींवर जिल्ह्याची नोंद आणि कंपनीचाही शिक्का होता. त्यामुळे पुढील तपास आता महसूल विभागाला करावा लागणार आहे. पोलिस ठाण्यात केवळ नोंद घेण्यात आली आहे. सर्वच पेट्या महसूल विभागाकडे देण्यात आल्या आहेत. दुचाकीचा सांगाडा मात्र पोलिसांनी आपल्या ताब्यात ठेवला आहे. (प्रतिनिधी)पडकी विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली आहे. काल दहा पेट्या काढण्यात आल्यानंतर त्यात आणखी मतपेट्या असल्याची खात्रीही पोलिस व महसूल प्रशासनाने घेतली नाही. सामाजिक कार्यकर्ते गणेश सुपारकर पाणी उपसा करण्याचा सल्ला दिला होता. मात्र यंत्रणा नसल्याचे पोलिस व महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. ४या विहिरीत जिवंत साप आहेत. हे माहित असूनही धोका पत्करून सागर वाघ व राजू हिवाळे या दोघा युवकांनी पेट्या बाहेर काढल्या. या पेट्या काढणाऱ्यांच्या पाठीवर पोलिस व महसूल प्रशासनाने शाबासकीची थापही मारली नाही. त्यांना रोख पारितोषिक देणे गरजेचे होते. माजी नगरसेवक काशीनाथ मगरे यांनी पोलिसांना पाण्यात उतरा असे आवाहन केले होते.