मनपातील बोगस नोकर भरती रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:34 IST2017-08-08T00:34:34+5:302017-08-08T00:34:34+5:30
महापालिकेत मार्च २०१७ मध्ये दोन कर्मचाºयांची दैनिक वेतनावर नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची दिशाभूल करून या नियुक्त्या करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या दोन्ही कर्मचाºयांच्या नियमबाह्य नियुक्त्या आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी रद्द केल्या.

मनपातील बोगस नोकर भरती रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेत मार्च २०१७ मध्ये दोन कर्मचाºयांची दैनिक वेतनावर नियुक्ती करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची दिशाभूल करून या नियुक्त्या करण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. या दोन्ही कर्मचाºयांच्या नियमबाह्य नियुक्त्या आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी रद्द केल्या. नियम धाब्यावर बसवून या नियुक्त्या देणारे अधिकारी व कर्मचाºयांना अभय देण्यात आले आहे.
महापालिकेत यापूर्वी ११२४ कर्मचाºयांची भरती करण्यात आली होती. या भरतीनंतर मनपाने परस्पर कोणतीही भरती करू नये, असे आदेश २००३ मध्ये शासनाने मनपाला दिले होते. या आदेशाला धाब्यावर बसवून मीरा नारायण सपाटे, वंदना घनश्याम जाधव या दोन महिलांची दैनिक वेतनावर नियुक्ती करण्यात आली होती. नारायण सपाटे हे मनपात दैनिक वेतनावर कार्यरत होते. मेंदूज्वराने २०१३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी मीरा सपाटे यांनी नोकरीसाठी मनपाकडे अर्ज केला होता. त्याचप्रमाणे घनश्याम जाधव हे सुद्धा मनपात दैनिक वेतनावर होते. २०१२ मध्ये त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वंदना जाधव यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता.
मानवीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांना दैनिक वेतनावर नियुक्ती द्यावी, असा प्रस्ताव आस्थापना विभागाने तयार केला.
तत्कालीन आयुक्तांनीही शहानिशा न करता नियुक्ती देण्यासाठी फाइलवर सही केली. मनपा अधिकाºयांनी सपाटे आणि जाधव यांना त्वरित नियुक्तीपत्र प्रदान करून शिक्षण विभागात नेमले होते. या नेमणुकांसाठी मनपा अधिकाºयांनी अनुकंपाचा आधार घेतला होता. वास्तविक पाहता दैनिक वेतनावर काम करणाºया कोणत्याही कर्मचाºयाला अनुकंपाचा नियम लागू होत नाही.
दैनिक वेतनावरील ३४ कर्मचाºयांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना मनपाने मानवीय दृष्टिकोनातून नोकरी का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता.