बोगस डॉक्टरांची कुंडली तयार !

By Admin | Updated: December 20, 2015 23:51 IST2015-12-20T23:40:04+5:302015-12-20T23:51:36+5:30

लातूर : ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, आरोग्य विभागाच्या दप्तरी अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत

Bogus doctor's horoscope ready! | बोगस डॉक्टरांची कुंडली तयार !

बोगस डॉक्टरांची कुंडली तयार !


लातूर : ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, आरोग्य विभागाच्या दप्तरी अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने संशयित १९२ डॉक्टरांची कुंडली तयार केली असून, आता त्यांच्यावर शोध समितीचीही नजर आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रमाणित पदवी व पदविका नसलेले अनेक डॉक्टर्स राजरोसपणे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. दीड वर्षांपूर्वी बोगस डॉक्टर शोध समितीने अशा ५४ डॉक्टरांवर त्या-त्या पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद केले होते. त्यानंतर बोगस डॉक्टरांनी जिल्ह्यातून पळ काढला होता. परंतु, आता गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पुन्हा बोगस डॉक्टरांचे लोन ग्रामीण भागात पसरले आहे. बंगाली, बिहारी डॉक्टरांचा त्यात समावेश आहे. १९२ बोगस डॉक्टर असा वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची सर्व कुंडली आरोग्य विभागाने संकलित केली आहे. ही कुंडली बोगस डॉक्टर शोध समितीच्या हवाली लवकरच केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्याची कारवाई केली जाणार आहे.
लातूर तालुक्यातील मुरुड, बोरगाव, तांदुळजा, गातेगाव तसेच औसा तालुक्यातील किल्लारी, भादा, लामजना, रेणापूर तालुक्यातील पानगाव, कामखेडा, शेरा, खरोळा, निलंगा तालुक्यातील अंबुलगा परिसरात संशयित बोगस डॉक्टरांचा वैद्यकीय व्यवसाय आहे. याबाबत अनेक तक्रारी जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा डॉक्टरांवर पाळत ठेवून त्यांची कुंडली तयार केली आहे. जिल्ह्यातील दहाही तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात अशा व्यवसायिकांची यादी तयार करून जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांना सादर केली आहे. गेली दोन-अडीच महिने संबंधित डॉक्टरांची सर्व कुंडली तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर शोध समिती जिल्ह्यात कार्यरत आहे. या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. सचिव म्हणून जिल्हा पोलिस उपाधीक्षक तर जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि एक खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असे तीन सदस्य आहेत. या समितीकडे ही कुंडली सादर झाली आहे. त्यांच्यावर आता अचानक कधीही कारवाई होणार आहे.
रेणापूर, तांदुळजा, मुरुड, बोरगाव परिसरातील बोगस डॉक्टरांवर दीड वर्षांपूर्वी गुन्हे दाखल केले होते. त्यातील काही दोन-चार जणांचा पुन्हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली आहे. त्यांच्यावरही पाळत असून, जरी ते कारवाई दरम्यान पळून जाण्यात यशस्वी झाले तरी त्यांची सर्व कुंडली आरोग्य विभागाकडे असल्याने फौजदारी स्वरुपाची कारवाई अटळ आहे.
४जळकोट, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर तालुक्यांतही बोगस डॉक्टरांचा वावर आहे. १९२ संशयित डॉक्टरांपैकी निम्मे डॉक्टर्स या परिसरात र्कारत आहेत. या सर्वांची कुंडली आरोग्य विभागाने संकलित केली असून, त्यांच्यावर कारवाई अटळ आहे.

Web Title: Bogus doctor's horoscope ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.