जालना तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

By Admin | Updated: May 20, 2014 01:06 IST2014-05-20T00:44:30+5:302014-05-20T01:06:56+5:30

जालना : खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून तीन-चार वर्षांच्या अनुभवावर अथवा बोगस पदवी मिळवून ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या डॉक्टरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

In Bogra, a surge of bogus doctors increased | जालना तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

जालना तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

जालना : खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून तीन-चार वर्षांच्या अनुभवावर अथवा बोगस पदवी मिळवून ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या डॉक्टरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात शेकडो डॉक्टरांनी आपला धंदा थाटला आहे.कोणतीही पदवी अथवा प्रमाणपत्र नसताना केवळ अनुभव व जुजबी माहितीवर रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. आरोग्य विभागाचाही या प्रकाराकडे कानाडोळा असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मोठ-मोठे फलक लावून हे डॉक्टर बिनधास्तपणे आपला व्यवसाय चालवीत आहेत़ औषधोपचाराच्या नावाखाली ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर लूट करीत आहेत़ ग्रामीण जनतेकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असल्याची चर्चा गावात आहेत़ तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी वारंवार होत आहे़ तरीही आरोग्य विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे़ अनेक वर्षांपासून शहरासह परिसरात आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस अशी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. परिणामी या बोगस डॉक्टरांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांचा लाखमोलाचा जिवाशी हे बोगस डॉक्टर सहज खेळत आहेत. (वार्ताहर)

Web Title: In Bogra, a surge of bogus doctors increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.