अंजना पळशी प्रकल्पाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:02 IST2021-08-28T04:02:56+5:302021-08-28T04:02:56+5:30

अंजना पळशी प्रकल्पाजवळील टेकडी भागातील झाडाला गुरुवारी संध्याकाळी करण शिखरे याने गळफास घेतलेल्या अवस्थेत काही शेतकऱ्यांना दिसून आला. माहिती ...

The body of the youth was found near Anjana Palashi project | अंजना पळशी प्रकल्पाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला

अंजना पळशी प्रकल्पाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला

अंजना पळशी प्रकल्पाजवळील टेकडी भागातील झाडाला गुरुवारी संध्याकाळी करण शिखरे याने गळफास घेतलेल्या अवस्थेत काही शेतकऱ्यांना दिसून आला. माहिती पसरताच घटनास्थळी गर्दी जमा झाली होती. पिशोर पोलीस ठाण्यात माहिती मिळाल्यावरून, सपोनि. हरिशकुमार बोराडे, जमादार किरण गंडे, वसंत पाटील, पो.कॉ. खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने करण यास खाली आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. शुक्रवारी नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण न समजल्याने पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जमादार किरण गंडे हे करीत आहे. करण हा अविवाहित होता. त्याच्यापश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The body of the youth was found near Anjana Palashi project