विहिरीत तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:04 IST2021-07-09T04:04:01+5:302021-07-09T04:04:01+5:30

हिरापूर शिवारातील घटना; मयताची ओळख पटली वाळूज महानगर : हिरापूर शिवारातील एका विहिरीत गुरुवारी (दि. ८) दुपारी २ वाजण्याच्या ...

The body of a young man was found in the well | विहिरीत तरुणाचा मृतदेह सापडला

विहिरीत तरुणाचा मृतदेह सापडला

हिरापूर शिवारातील घटना; मयताची ओळख पटली

वाळूज महानगर : हिरापूर शिवारातील एका विहिरीत गुरुवारी (दि. ८) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह वाळूज पोलिसांना मिळून आला आहे. दीपक सुभाष मुळे (२८ रा. लांझी) असे मृताचे नाव आहे.

हिरापूर शिवारातील गट क्रमांक १५ मधील विकास देशपांडे यांच्या पडीक शेतातील विहिरीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, उपनिरीक्षक मनीषा केदार, पोना. विठ्ठल खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी मनपाच्या अग्निशमन विभागाला पाचारण केले. दरम्यान, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी जिकठाणचे डॉ. उज्ज्वल चव्हाण यांना घटनास्थळी बोलावून शवविच्छेदन केले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा मृतदेह दीपक सुभाष मुळे (२८ रा. लांझी) याचा असल्याचे स्पष्ट झाल्याने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The body of a young man was found in the well